क्राईम

कल्याण हादरलं! तरुणीवर सहा नराधमांकडून वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

कल्याण : भिंवडीमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर सहा नराधमांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. भिवंडीतील एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर त्याच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपी नराधमांनी अगोदर भावाचे अपहरण करत त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या बहिणीला बोलावून घेतले आणि तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी याप्रकरणी सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील शांतीनगर परिसरात वास्तव्यास असणारी तरुणी तिच्या आतेबहि‍णीकडे गेली होती. दरम्यान, रात्री १२ वाजता तिला अचानक जाग आली तेव्हा तिने बघितले की मोबाईलवर तिच्या भावाचे अनेक मिस्डकॉल होते, ते पाहून तिने भावाला फोन केला. यावेळी भावाने सांगितले की, माझी तब्येत ठीक नाही तू ताबडतोब बागे फिरदौस या ठिकाणी ये. त्यानंतर ती रिक्षाने तिकडे निघाली. ती पोहोचल्यानंतर, सहा आरोपी, ज्यांनी आधीच तिच्या भावाचे अपहरण केले होते आणि त्याला मारहाण केली होती, त्यांनी महिलेला झुडुपात नेले, जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर बागे फिरदौस येथून तरुणीसह तिच्या भावालाही रिक्षात जबरदस्ती बसवून नेण्यात आले. मुख्य आरोपी मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू ,गोलू आणि इतर दोन जण (सर्व राहणार फातमा नगर) यांनी तरुणीला जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता वासनांध नराधमांनी तिला पुन्हा फातमा नगरात आणले आणि तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीमध्ये पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या सर्व प्रकारानंतर हे सर्व नराधम तिला धमकी देऊन पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षा चालकाला सोडून तेथून पसार झाले.

या भयंकर घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी सहा गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ६४(२)(ड) (बलात्कार), ७०(१) (सामूहिक बलात्कार), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत) आणि ३(५) (सामान्य हेतू असलेल्या अनेक लोकांनी केलेला फौजदारी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पीडित तरुणी आता रुग्णालयात आहे आणि पुढील तपास भिवंडीतील शांती नगर पोलिस करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सहा आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago