अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. ट्रम्प यांनीच आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प हेलिकॉप्टरमधून वॉल्टर रिड लष्कर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. याआधी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला.
या व्हिडीओत डोनाल्ड ट्रम्प आपली प्रकृती चांगली असून, सर्व योग्य रितीने पार पडेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्पही करोनाबाधित आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आपण मास्क वापरणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता करोनाची लागण झाल्याने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला आहे. ट्रम्प दाम्पत्याला सौम्य लक्षणं असली तरी ट्रम्प यांचे वजन अधिक असल्याने त्यांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…