कोरोना

व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. पांडुरंग हे टीव्ही ९ मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्री त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती प्रचंड ढासळली.

यावेळी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र, पुण्यात कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकलं नाही. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण कोव्हिड सेंटर ते रुग्णालय या प्रवसाकरिता त्यांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला. त्यामुळे पांडुरंग यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. आज(२ सप्टेंबर) पहाटे साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेली १५ वर्ष पांडुरंग रायकर हे पत्रकारितेत होते. ई टीव्ही, एबीपी माझा, टीव्ही ९ या वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. साधारण २ वर्षांपासून ते पुण्यात रिपोर्टिंग करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुलं आणि पत्नी असा एकूण परिवार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago