congress leader and revenue minister balasaheb thorat criticized bjp over bjp free vaccine promise
अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी निरीक्षणे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळविली आहेत. स्वत:च्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे, आपण नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा केला. या दौर्यात स्थानिक पातळीवरील माहिती तालुक्यातील अधिकारी व लोक प्रतिनिधींशी चर्चा करताना समजली. त्यामध्ये स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट कीट उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते. वस्तुस्थिती तशी नाही. कोरोना पॉझीटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांना देण्यासाठी पॅरासिटामॉल, सिट्रीझिन, झिन्क, अझिथ्रोमायसिन, फॅबीफ्ल्यू या साध्या औषधी शासकीय रुग्णालये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना पुढील ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन असे उपचार देण्याची वेळ येते. ही औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही व्हावी,’ असं थोरातांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे.
ते पुढे म्हटले कि, नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर एचआरसिटी करण्याकडे नागरीकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनिंग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणे सुद्धा रुग्ण वाढीचे कारण ठरत आहे. रुग्णालयात दाखल करतांना डॉक्टर या एचआरसिटी रिपोर्टचा आग्रह धरतात. याबाबत निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतांनाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमडेसिवीर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक आहे,’ असेही थोरात यांनी सूचविले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…