कोरोना

२४ तासात भाजपच्या ५ नेत्यांना कोरोनाची लागण

करोनाने देशभरात थैमान घातलेलं असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरु आहेत. मागील २४ तासांत भाजपाच्या पाच नेत्यांना करोनाची लागण झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे.

उत्तर प्रदेशचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. स्वतंत्र देव सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, ‘लक्षणे दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना निवेदन आहे की नियमांनुसार त्यांनी क्वारंटाइन व्हावं तसेच गरज पडल्यास करोना चाचणी करावी.

‘उत्तर प्रदेश योगी सरकारमधील मंत्री डॉक्टर महेंद्र सिंह यांचा रविवारी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

आग्राच्या भाजपा आमदार योगेंद्र उपाध्याय यांनाही करोना झाल्याचं रविवारी समोर आलं. योगेंद्र उपाध्याय यांच्या पत्नी, दोनं मुलं आणि सूनेलाही करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago