Shreyas Iyer subluxated his left shoulder
क्रीडा

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर, आयपीएलच्या १४व्या सीझनमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह..

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी पुण्यात पहिला वनडे सामना झाला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, फलंदाजी करताना रोहित शर्माला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात चेंडू अडवण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरला दुखापत झाली. श्रेयसच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वनडे सामन्यात खेळू शकणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात शार्दुल ठाकूरला जॉनी बेयरस्टोने शॉट मारला. हा चेंडू अडवण्यासाठी श्रेयसने हवेत झेप घेतली. यामुळे इंग्लंडला चार ऐवजी फक्त दोन धावा मिळाल्या. पण श्रेयसच्या खांद्याला मार बसला. त्यानंतर सपोर्ट स्टाफच्या मदतीने तो मैदानाबाहेर गेला. दुखापत गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आले. श्रेयसची दुखापत इतकी गंभीर आहे की तो कदाचीत ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या सीझनमध्ये खेळू शकणार नाही. श्रेयसला झालेल्या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत