World Athletics Championships: Neeraj Chopra Javelin Throw

नीरज चोप्राची दमदार कामगिरी, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसह पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र

क्रीडा

नवी दिल्ली : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण 12 खेळाडू सहभागी होणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. सध्या क्वॉलिफिकेशन राउंड म्हणजेच पात्रता फेरी सुरु आहे. नीरज चोप्रा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला ॲथलिट ठरला आहे. त्यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.

नीरज चोप्राला ‘सुवर्ण कामगिरी’ करण्याची संधी
अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी खेळाडूला किमान 83 मीटर अंतरावर भाला फेकावा लागतो नीरजने पहिल्याच प्रयत्नात दमदार थ्रो केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवता आलेले नाही. त्यामुळे आता नीरज चोप्राकडे भारतासाठी ही कामगिरी करण्याची संधी आहे. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदकाची कमाई केली होती. तर, गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण, यावेळी नीरज चोप्राचं लक्ष्य सुवर्ण पदकावर आहे.

नीरज चोप्रा सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. नीरज गुणतालिकेतही अव्वल स्थानी पोहोचला आहे. नीरज चोप्रा या स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचा हा थ्रो यंदाच्या हंगामातील त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत