क्रीडा

फाटलेला बूट घालून मोहम्मद शमी करीत आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी, कारण..

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या डावात 244 धावा केल्या असून या कसोटी सामन्यात भारतानेही चांगली सुरुवात करुन ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मात्र, जेव्हा मोहम्मद शमी सामन्यात गोलंदाजी करायला आला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

या सामन्यात शमीने फाटलेला शू घातला आहे. सामन्यादरम्यान जेव्हा शमीच्या डाव्या पायाच्या शूवर कॅमेरा फोकस होता तेव्हा त्याचा शू समोरच्या बाजूने फाटलेला होता. अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ आणि शेन वॉर्न हे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू कॉमेंट्री करताना याबद्दल बोलत होते.

शेन वॉर्न म्हणाले की, मोहम्मद शमीचा हाई आर्म अ‍ॅक्शन (high arm action) आहे. त्यामुळे जेव्हा तो बॉल टाकतो तेव्हा त्याच्या डाव्या पायाचे बोट शूजच्या आतील बाजूस जाते आणि यामुळे गोलंदाजीमध्ये अडचणी येऊ शकतात. हे टाळण्यासाठी, शमीच्या एका शूजमध्ये छिद्र दिसत आहे. त्यानंतर त्यांनी विनोद केला की, आशा आहे की शमी फलंदाजी दरम्यान फाटलेला शूज घालणार नाही, कारण ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज यॉर्कर बॉल्सने त्याला अवघड परिस्थितीत टाकू शकतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी…

4 दिवस ago

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही,…

6 दिवस ago

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या…

6 दिवस ago

‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला अधिकार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कार्यवाही करत असून दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी विविध निर्णय…

6 दिवस ago

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर; मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक

मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ या आंतरराष्ट्रीय…

6 दिवस ago

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

मुंबई : दीपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती…

6 दिवस ago