IPL २०२१ : आज अहमदाबाद येथे होणार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यातील सामना कोरोनामुळे रद्द झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघातील काही खेळाडू आणि कर्मचारी आजारी पडले आहेत आणि ते विलगीकरणात आहेत. दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यातील आजचा आयपीएल सामना रद्द झाला आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार होता. आयपीएलने याबाबत ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे.
UPDATE: IPL reschedules today’s #KKRvRCB match after two KKR players test positive. #VIVOIPL
Details – https://t.co/vwTHC8DkS7 pic.twitter.com/xzcD8aijQ0
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2021




