मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत.
आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती.
NEWS ? : BCCI to conduct remaining matches of VIVO IPL in UAE.
More details here – https://t.co/r7TSIKLUdM #VIVOIPL pic.twitter.com/q3hKsw0lkb
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2021
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. BCCI ने कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या IPL 2021 चे उर्वरीत सामने यूएईला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाळा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.




