CSK team's new jersey for this year's IPL
क्रीडा

CSK संघाची यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सी, जाणून घ्या काय आहे खास…

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे. चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’ आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात.

चेन्नई सुपर किंग्सने जर्सीचं अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली. “सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होतो. हा कॅमोफ्लॉज त्यांच्यासाठीच आहे…तेच आपले खरे नायक आहेत”, असं CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत