मुंबई,दि.१५ निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या नौका […]
Sample Page
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रधानमंत्री मोदी यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा […]
बिकानेरच्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोठी दुर्घटना, दोन जवान शहीद, एक गंभीर जखमी
राजस्थान : राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सरावादरम्यान मोठी दुर्घटना घडली. सराव सुरु असताना बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमधील चार्ली सेंटरमध्ये घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाला सुरतगड […]
पुणे : दोन विद्यार्थिनींवर शाळेत लैंगिक अत्याचार, डान्स इन्स्ट्रक्टरला अटक
पुणे : एका नामांकित शाळेतील नृत्य प्रशिक्षकावर दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी शाळा प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर, पालकांनी बुधवारी (18 डिसेंबर) शाळा बंद ठेवण्याचे आवाहन […]
पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागली आग; आग विझवताना अग्निशामक कर्मचारी जखमी
पुणे : आज सकाळी पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्या, ज्यामुळे पुणे अग्निशामक दल आणि पीएमआरडीए अग्निशामक सेवा यांची तत्काळ आवश्यकता भासली. पहिली घटना पहाटे 03:53 वाजता वारजे, दांगट पाटील नगर येथे घडली, जिथे मंडपाचे साहित्य असलेल्या गोदामाला आग लागली. मंगडेवाडी येथे पहाटे 04:36 वाजता दुसरी आग लागली, जिथे प्लायवूडचे साहित्य होते. पुणे आणि पीएमआरडीएच्या […]
प्रसिद्धीसाठी काहीही! मुलीचे कुत्रीसोबत नको ते कृत्य, नेटकरी संतापले…
आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा रीलमध्ये असे काहीतरी दिसते, जे खूप विचित्र असते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी कुत्रीचे दूध पिताना दिसत आहे. लोक या व्हिडिओवर विविध कमेंट करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. X वरील काही हँडल्सनी हा व्हिडिओ आणि स्क्रीनशॉटही शेअर केले […]
आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना वाचवण्यामध्ये टीम इंडिया यशस्वी ठरली आहे. हा सामना अनिर्णित ठरला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आर. अश्विन याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आर. अश्विन याने ६ डिसेंबर २०११ ला विंडिजविरूद्ध […]
खुशखबर! लाडक्या बहिणींना या महिन्यापासूनच मिळणार 2100 रुपये, 6वा हप्ता केव्हा मिळणार जाणून घ्या…
नागपूर : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याच्या घोषणेनंतर या महिन्यापासूनच 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरकार सहावा हप्ता कधी देणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरीही या महिन्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात अशी बातमी आहे. दरम्यान, सोमवारी नागपूर अधिवेशनादरम्यान, […]
ट्रेलर दुभाजकाला धडकून पलटला, चालकाचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू
रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खैरेवाडी येथे ट्रेलर दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय ३३) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नागोठाणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टॉपच्या समोर […]
जॉर्जियातील रेस्टॉरंटमध्ये आढळले ११ भारतीयांचे मृतदेह, भारतीय दुतावासाकडून घटनेबाबत पुष्टी
जॉर्जिया : जॉर्जियातील गुदौरीच्या एका रेस्टाँरंटमध्ये ११ भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. भारतीय दुतावासाने या घटनेबाबत पुष्टी दिली आहे. जॉर्जियातील अंतर्गत मंत्रालयाच्या प्राथमिक तपासात कोणाच्याही शरीरावर जखमेची कोणतीही खून आढळून आलेली नाही. जॉर्जियाच्या स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की, कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे हा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होत्या, ज्यांचे […]