devendra fadnavis on bihar election
राजकारण

बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा – देवेंद्र फडणवीस

मुंबई : बिहारच्या जनतेला जंगलराज नको, तर विकास हवा आहे. हे त्यांनी या निवडणुकीतून सिद्ध केलं आहे. या निवडणुकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणखी एक मोहर लागली आहे. बिहारच्या जनतेने बिहारचे मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला आहे. मी बिहारच्या जनतेचं कोटी कोटी अभिनंदन करतो. त्यांना अभिवादन करतो, देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. बिहारसह या राज्यांमध्येही पंतप्रधान मोदींवर विश्वासाची लहर आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगना तसेच इतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपने बिहारमध्ये 110 जागांवर निवडणूक लढली. यापैकी जितक्या जागांवर विजय मिळाला त्याचं प्रमाण 67 टक्के इतकं आहे. हे प्रमाण 2015 च्या निवडणुकीत फक्त 34 टक्के होतं. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदीचं गरिब कल्याण अजेंडा आणि कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जातं. मी भाजपच्या बिहारच्या टीमचं अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. बिहारच्या युवा पिढीने सिद्ध केलंय की, नवं दशक हे बिहारचं असेल. बिहारच्या युवकांनी एनडीएच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे. या युवा ऊर्जामुळे एनडीएला आणखी परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत