Yuvraj Singh wrote a message on the occasion of his birthday
देश

युवराज सिंग वाढदिवसानिमित्त संदेश लिहीत देशवासीयांसमोर बोलला मनातलं…

चंदीगड : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज 39 वर्षाचा झाला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करताना युवराज सिंगने म्हटलं आहे की आपले शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चालू असलेल्या चर्चेचे त्वरित निराकरण व्हावे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

युवराज सिंहने एक संदेश लिहीत त्यात म्हटलं आहे की, “प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करण्याची संधी असते आणि माझी अशी इच्छा आहे कि, आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून त्वरित मार्ग निघावा. शेतकरी आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. माझा असा विश्वास आहे कि, अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. शांतपणे केलेल्या चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो.”

युवराज सिंगने आपल्या वडिलांनी केलेलं वक्तव्य निराशाजनक असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांचं वक्तव्य अत्यंत निराशाजनक आहे आणि ते त्यांचं व्यक्तिगत मत असून माझी विचारधारा त्यांच्या विचारांशी सहमत नाही.”

पुढे युवराज म्हणाला कि, अजूनही कोरोनाचं संक्रमण कमी झालं नसून प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी आपण पूर्णपणे सावध राहण्याची गरज आहे.

काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेले युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत