Who holds the post of Chief Minister of Bihar? Devendra Fadnavis made it clear

बिहारचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

देश

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयावर प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असं देखील सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फडणवीसांनी यावेळी म्हटलं की, “मुख्यमंत्री जेडीयूचा होईल आणि ते नितीश कुमार असतील हे आधीच ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तशी घोषणा केली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही. भाजपा शब्दाचं पक्कं आहे. महाराष्ट्रात मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांच्या संमतीने भाजपाचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली होती. आम्ही त्यावर अडून राहीलो. इथे मोदींनी जेडीयूचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करु”.

“प्रत्येक निवडणूक काही तरी शिकवून जाते. शिकत प्रगल्भता येत असते. महाराष्ट्रातील अनुभवाच्या आधारे बरेच निर्णय घेताना फायदा झाला,” असंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, पवार साहेब मोठे नेते आहेत त्यावर काही बोलायचं नाही. माझ्यामुळे निवडणूक जिंकलो असं मी म्हटलेलं नाही असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रासहित इतर राज्य सरकारं टीका करत असताना मोदी गरीबांची सेवा करत होते. अविरत प्रयत्न केले. त्यांच्या घरी चूल पेटली पाहिजे, खात्यात पैसा गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते. फक्त बिहार नाही तर संपूर्ण देशातील पोटनिवडणुकीत लोकांनी विश्वासाची लाट दाखवली आहे. त्यामुळे हा मोदींच्या विश्वासाचा विजय आहे. त्यात मला खारीचा वाटा उचलता आला याचा आनंद.”

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “चीत झाले तरी आमचं बोट वर आहे अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. अशा प्रकारे ते नेहमीच युक्तीवाद करत असतात. मॅन ऑफ द मॅच, सीरिज नरेंद्र मोदी आणि भाजपाच आहेत. “नितीश कुमारांचा चेहरा बेदाग आहे. काम झालं की नाही यावर चर्चा करु शकता पण चेहऱ्यावर डाग लावू शकत नाही. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. शिवसेनेने याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. जोरदार यादीपण घोषित केली होती, पण काय अवस्था झाली हे पाहिलं आहे”.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत