Union Education Minister announces about 10th and 12th CBSE exams
देश

मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई परीक्षांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत. 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे ठरेल. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होतील, असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.

सीबीएसई परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई मेन 2021 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसमोर अधिक पर्याय उपलब्ध असतील, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांच्या दोन विभागातील फक्त 75 प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत