Senior Congress leader Motilal Vora passes away

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

देश राजकारण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रविवारी रात्री उशिरा एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मोतीलाल वोरा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु, त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. मोतीलाल व्होरा यांना मूत्रपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते. 1985 साली ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. दीर्घकाळ काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी निभावली. व्होरा यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक सच्चा कार्यकर्ता, काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणारा नेता गमावला, असे म्हणत राहुल गांधी यांनी व्होरा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत