Punishment of working in Covid Center for non-compliance with Corona rules - High Court

कोरोनाविषयी नियम न पाळल्यास कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा – उच्च न्यायालय

देश

लोकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांकडून सातत्यानं केलं जात आहे. मात्र, काहीजण मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. या विषयावर चिंता व्यक्त करताना गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विशाल अवतणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती जे.बी. पर्दीवाला यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला आहे. जे नागरिक कोरोनाविषयीच्या सूचनांचं पालन करत नाहीत, त्यांना कोविड सेंटरमध्ये सेवा करणे अनिवार्य करणारे आदेश काढण्यात यावे, असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं.

कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांना कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी. दिवसांतून चार ते पाच तास त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावं, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. नियमभंग केलेल्या नागरिकांकडून कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, जेवण तयार करणे, मदत करणे, सेवा करणे, कोविड केंद्रातील इतर कामे करून घेतली जाणार आहे. ही शिक्षा नियमभंग करणाऱ्या व्यक्तीच्या वय, पात्रता, लिंग यानुसार ठरवली जाणार आहे. यासंदर्भातील कार्य अहवाल २४ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत