झारखंड : रांची येथील अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांच्या पथकाने छापा मारून रॅकेटचा भंडाफोड केला. फ्लॅटमधून तीन महिलांसह एकाला अटक केली आहे.
अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी फ्लॅटमधून दारू, सिगारेट आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू हस्तगत केल्या आहेत. अटक केलेले चौघेही वेगवेगळ्या परिसरातील आहेत. पोलीस चौकशी करत असून, सर्वांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅच्या माध्यमातून या सेक्स रॅकेटशी संबंधित लोक संपर्कात होते. या रॅकेटशी अनेक बड्या लोकांचा संबंध असल्याची चर्चा आहे.