देश

पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले, गूगलची कारवाई

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे कि, या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही.

गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये चौकशीनंतर कंपनीकडून अधिकृतपणे पत्रक जारी करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आता फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.

“ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे असे आमचे नियम आहेत. एखाद्या अ‍ॅपने याचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यासंदर्भातील नियमांची माहिती अ‍ॅपच्या डेव्हलपर्सला देतो. यासंदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अ‍ॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते. मात्र अनेकदा सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अ‍ॅपवर आम्ही कारवाई करतो.” असं गुगलने म्हटलं आहे.

दरम्यान, यावर पहिली प्रतिक्रिया देताना पेटीएमने ट्विटवरुन गुगल प्लेवर आता अ‍ॅप उपलब्ध नसेल असं स्पष्ट केलं आहे. “प्रिय पेटीएम युझर्स, पेटीएमचे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन तात्पुरत्या स्वरुपात गुगलच्या प्ले स्टोअवर उपलब्ध नसेल. नवीन युझर्सला डाउनलोड करण्यासाठी तसेच डाऊनलोड केलेल्यांना अपडेट करण्यासाठी सेवा पुरवली जाणार नाही. लवकरच आम्ही परत येऊ. तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत. तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचे पेटीएम अ‍ॅप वापरु शकता,” असं कंपनीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

7 दिवस ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

7 दिवस ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago