देश

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून गरिबांसाठी घरे, 6 राज्यांत लाइट हाऊस प्रकल्प सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या दिशेने पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन केले. नवीन वर्षात पंतप्रधान मोदींचा हा पहिला कार्यक्रम आहे.

पीएम मोदींचा हा कार्यक्रम शहरी भारतातील लोकांना घरे पुरविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड आणि तमिळनाडूमधील गरीब लोकांना स्वस्त, भूकंपविरोधी आणि मजबूत घरे देतील.

कार्यक्रमास संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान देशात येत आहे. हे 6 लाईट हाऊस प्रकल्प देशाला घरांच्या बांधकामाच्या नव्या दिशा दाखवतील. पंतप्रधान म्हणाले की हे ऑपरेटिव्ह फेडरलिझमचे उदाहरण आहे. हे लाइट हाऊस प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाने बनविले जातील. ते अधिक मजबूत असतील आणि गरिबांना सुविधासंपन्न आणि आरामदायक घरे मिळतील.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले कि, एक काळ असा होता की बांधकाम करणे ही सरकारची प्राथमिकता नव्हती. पण आता ते बदललं गेलं. ते म्हणाले की, गृहनिर्माणदेखील आता स्टार्ट अप प्रमाणे सुव्यवस्थित केले जाईल.

लाईट हाऊस प्रकल्प काय आहे?

लाइट हाऊस प्रकल्पासाठी ज्या राज्यांची निवड झाली आहे त्यात त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरात आहेत. लाईट हाऊस प्रकल्प ही केंद्रीय शहरी मंत्रालयाची एक महत्वाकांक्षी योजना आहे, ज्या अंतर्गत लोकांसाठी स्थानिक वातावरण आणि पर्यावरणाला ध्यानात घेऊन शाश्वत घरांची व्यवस्था केली जाईल.

या प्रकल्पात मजबूत आणि स्वस्त घरे खास तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली जातात. या प्रकल्पात, बीम-कॉलम आणि पॅनेल फॅक्टरीमधूनच तयार करून घर बनवण्याच्या जागेवर आणले जातात, याचा फायदा असा होतो की बांधकाम कालावधी आणि किंमत कमी होते. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी येतो. या प्रकल्पांतर्गत तयार केलेली घरे पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असतील. तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर लाईट हाऊस प्रकल्पात दिसून येईल, ज्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी केला जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago