police officer started a betting den
क्रीडा देश

चक्रावून सोडणारी घटना, पोलीस अधिकाऱ्याने सुरू केला सट्टेबाजीचा अड्डा..

कर्नाटक : आयपीएलचे सामने म्हटले की देशभरात सट्टेबाजार मोठ्या प्रमाणात चालतो, परंतू कर्नाटक राज्यातील सट्टेबाजांच्या कारवाईवर नियंत्रण आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने आपला स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी एका मोठ्या आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याचं नाव पुढे केलं आणि सगळेच चक्रावले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल मंजुनाथ याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुनाथ गेल्या काही दिवसांपासून स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा चालवत होता. सट्टेबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकात मंजुनाथ काम करत होता. ज्यावेळी पोलिसांची टीम एका सट्टेबाजीच्या किंवा जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकायची त्यावेळी मंजुनाथ तिकडची सर्व कार्यपद्धती समजवून घ्यायचा. याचा फायदा घेत त्याने स्वतःचा जुगार आणि सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. आपला स्वतःचा जुगार अड्डा सुरु करण्यासाठी मंजुनाथने अनेक नावाजलेल्या सट्टेबाजांचीही मदत घेतल्याचं समोर येतंय. इतकच नव्हे तर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनाही मंजुनाथने पैसे देवून धाड पडणार असेल तर त्याची माहिती देण्यासाठी ठेवलं होतं. चिक्कबलपुरा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जी.के. मिथुन कुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

हेड कॉन्स्टेबल मंजुनाथला तात्काळ निलंबीत करण्यात आलं आहे. मंजुनाथसोबत या सट्टेबाजीत आणखी कोणी पोलीस अधिकारी सहभागी होते का याचा तपास सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत