Even after being vaccinated against corona Anil Vij tested corona positive
देश

कोरोनाची लस घेऊनही अनिल वीज यांना कोरोनाची लागण

हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल वीज यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधात माहिती दिली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या भारतीय लस असलेल्या ‘कोव्हॅक्सीन’च्या चाचणी टप्प्यात अनिल वीज यांनी सहभाग घेतला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनिल वीज यांना अंबाला कॅन्टच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोविड प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करवून घेण्याचं आवाहन वीज यांनी केलं आहे.

‘कोव्हॅक्सीन’ लस घेऊनही अनिल वीज करोना संक्रमित आढळल्यानं लशीच्या परिणामकारकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकची लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. अनिल वीज यांनी अंबालाच्या एका रुग्णालयात २० नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रोटोकॉलनुसार, ०.५ मिलीग्रॅम डोस दिला जातो. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २८ व्या दिवशी दिला जातो. अनिल वीज यांना दुसरा डोस अद्याप दिला गेलेला नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत