राजस्थान : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, चांद्रयान-३ चंद्रावर उतरले आहे, पण राहुलयान आतापर्यंत ना उतरवले गेले आहे ना प्रक्षेपित झाले आहे.
‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. हे आजपर्यंत कोणत्याही देशाला करता आलेले नाही. भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल1 देखील सूर्याकडे रवाना झाले आहे. यावरही काँग्रेस प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करते, पण देशाचा मूड पाहून गप्प बसते.
राहुलयान २० वर्षांपासून लॉन्च होऊ शकले नाही : राजनाथ सिंह
मंगळयान, चांद्रयान आणि सूर्ययान यांचे लॉन्चिंग आणि लँडिंग देखील झाले, पण २० वर्षांपासून राहुलयानचे ना लँडिंग झाले, ना लॉन्चिंग झाले, असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस ‘हिंदू-मुस्लिम’ आणि ‘मागास’ असा उल्लेख करून राजस्थानमध्ये पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
जैसलमेर, राजस्थान से निकली है ‘परिवर्तन संकल्प यात्रा’। जनसभा में संबोधन। https://t.co/uMOv4FBJLG
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 4, 2023