उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे इंटरव्ह्यूसाठी बोलावले. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी या आरोपींना अटक केली आहे.
दोन्ही आरोपींनी दिल्लीच्या तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे बोलावून घेतले आणि तिथे हॉटेलमध्ये दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, हॉटेलवर बोलावल्यानंतर दोघांनी तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला, असा आरोप मुलीने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.




