A truck full of sand crashed Scorpio

वाळूने भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या स्कॉर्पिओवर कोसळला, आठ जण ठार

देश

उत्तर प्रदेशमध्ये कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास वाळू वाहून नेणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओ कारवर कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस कटर आणि इतर साहित्याच्या मदतीने गाड्यांचे अवशेष आणि वाळू बाजूला काढून खाली कोणी अडकलेलं नाही ना याची तपासणी केली असल्याचे समजते. घटनास्थळी पोहचलेले जिल्हाधिकारी अमित सिंह यांनी आठ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.

मरण पावलेले सर्वजण हे स्थानिक रहिवाशी असून ते एका लग्न समारंभावरुन येत होते. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांमध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाळूने भरलेला ट्रक थेट गाडीवर कोसळल्याने गाडीतील व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि ते वाळूखाली गाडले गेले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत