आयआयटी (IIT)मद्रास मधील 66 विद्यार्थ्यांचा आणि 5 कर्मचा-यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबर रोजी इन्स्टिट्यूट सुरू केली होती. आता सर्व विभाग बंद करण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, सुरुवातीला दोन केस 1 डिसेंबर रोजीच कॅम्पसमध्ये आढळून आल्या. यानंतर 10 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी आणखी काही कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आले. तीन दिवसांत येथे 55 प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर या परिसराला कोविड हॉटस्पॉट घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कॅम्पसमध्ये 774 विद्यार्थी आहेत. प्रत्येकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत आणि त्यांना बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. कृष्णा आणि जमुना या दोन वसतिगृहांमध्ये जास्तीत जास्त प्रकरणांची नोंद आहे. या व्यतिरिक्त काही प्राध्यापक व मेसचे कर्मचारी देखील संसर्गग्रस्त असल्याचे आढळले आहे.