सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरकुल देणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 16 : सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 2 हजार 980 घरकुलांची सोडत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक तीन घरकुलांची सोडत आज आभासी प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी डॉ. राऊत यांनी रिमोटची कळ दाबून सोडतीचा शुभारंभ केला. क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आदी यावेळी आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पंतप्रधान आवास योजना (शहरी) घटक क्रमांक 3 अंतर्गत सन 2018 पासून या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट 2019 रोजी एकूण 4 हजार 345 घरकुलांपैकी 4 हजार 172 घरकुलांची सोडत काढण्यात आली होती. एकूण 4 हजार 345 घरकुलांपैकी 2 हजार 980 घरकुले वाटपास उपलब्ध असून या घरकुलांची सोडत आज करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एन.एम.आर.डी.ए.) कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगत डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूरसारख्या महानगरामध्ये घरांचे स्वप्न साकार करणे हे सोपे नाही. वाढलेल्या जमिनीच्या किंमती, घरांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना शहरात घर बांधणे व स्वतःच्या घरात राहण्याची संधी फार कष्टाने मिळते. प्रत्येकाला स्वत:च्या हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना घरकुले मिळाली आहेत. या योजनेंतर्गत शहरात वाठोडा तरोडी (खुर्द) व वांजरी या भागात घरकुल बांधण्याचे प्रकल्प सुरू करून जवळपास 4 हजार 345 घरकुल बांधून तयार झालेली आहेत. म्हणजे एवढ्या लोकांना हक्काचे घर लवकरच मिळणार आहे. लोकांनी घरकुलांची सारी रक्कम भरल्याने त्यांना घरकुलाचा ताबाही मिळाला आहे. उरलेल्या जवळपास 3 हजार घरकुलांची सोडत झालेली आहे. शहराच्या विकासासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल वाटपाचे दुसरे टप्पे लवकरच विकसित करण्यात येणार आहे. एन.एम.आर.डी.ए. च्या योजनांना पालकमंत्री या नात्याने मी संपूर्ण सहकार्य करील, असा विश्वास डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वसामान्य माणूस आपल्या आयुष्याची पुंजी घर बांधण्यासाठी लावत असतो. त्यामुळे या योजनेंतर्गत घरांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे राहील, याकडे एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

या योजनेत सोडत लागलेल्या सर्व विजेत्यांना डॉ.राऊत, श्री.केदार तसेच श्री.तुमाने यांनी आभासी प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्यात.

एन.एम.आर.डी.ए.चे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार, प्रकल्प अभियंता लिना उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी मानले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

2 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

2 आठवडे ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

2 आठवडे ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago