मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात पुढील 3 दिवसांत उष्णतेची ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
उत्तर पच्छिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहायला उशीर होत आहे. सध्या आकाशदेखील निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेता रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील किनारी जिल्ह्यांना १४, १५ आणि १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जसे उन्हात जाणे टाळावे, सैल सुती कपडे वापरावे आणि भरपूर पाणी प्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Heat wave to severe heat wave conditions are very likely over parts of Konkan-Goa, including Mumbai during next 3 days.
येत्या 3 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/IV86u716BN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 14, 2022
14 व 15 मार्चला मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा.
14 मार्च दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा व 15 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा.
16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा.