Three tourists drowned at Anjarle beach

आंजर्ले समुद्रकिनारी पुण्यातील तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्र

दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी पुण्यातील तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांचा समावेश आहे. उबेद खान, सोहम चव्हाण, रोहित पलांडे यांना वाचवलं गेलं असून यांच्यावर आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे जिल्ह्यातील औंध येथील एका कंपनीत कामाला असलेले १४ जण आज दापोलीत पर्यटनाकरिता आले होते. हे सर्वजण सकाळी साडेनऊ वाजता आंजर्ले येथील समुद्र पाहण्याकरिता गेले. तेथे समुद्रात पोहायला गेल्यानंतर सहा जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल समुद्रात ओढले गेले. आरडाओरड झाल्यानंतर या सहा जणांना वाचविण्यासाठी स्थानिक लोकांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण किनाऱ्यावर येण्यापूर्वीच त्यापैकी तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

मदतकार्यामध्ये अभिनय केळसकर, नितेश देवकर, नीलेश गुहागरकर, तृशांत भाटकर, अभिजीत भाटकर, बाळा केळसकर, आवा मयेकर, दीपा आरेकर, पपू केळसकर हे मदतीसाठी धावून आले. त्यामुळे सहापैकी तीन जणांचे जीव वाचविण्यात यश आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत