ठाणे : घराशेजारी थुंकल्याच्या कारणावरून 13 वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या मुलाच्या एका नातेवाइकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. रूपेश विजय गोळे (वय 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यातील नागवाडीमध्ये हा मुलगा राहतो आणि या मुलाच्या घराशेजारीच त्याचा नातेवाइक आरोपी दशरथ काकडे (28) राहतो. 17 एप्रिलला दुपारी काकडे रूपेशला घेऊन बाहेर गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही रूपेश घरी परतला नाही. त्यानंतर रूपेशच्या मोठ्या भावाने दशरथला फोन करून रूपेशविषयी विचारले. त्याने सांगितले की रूपेशला 50 रुपये देऊन जत्रेमध्ये सोडले आहे. तरीही रूपेश घरी आलाच नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे मुंब्रा पोलिस ठाण्यात रुपेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी तपास सुरु केला आणि याबाबत दशरथकडे चौकशी केली. त्याने सांगितले की माझ्या मामाचा मुलगा रुपेशच्या वयाचा असल्यामुळे त्याला मापासाठी घेऊन कपडे आणायला गेलो होतो. त्यानंतर पोलिसांनी नेमके कपडे खरेदीसाठी कोठे गेले होते, याबाबत दशरथकडे चौकशी केली. त्याने रस्त्यावरील विक्रेत्याकडे कपडे घेण्यासाठी गेल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी त्या विक्रेत्याकडे चौकशी केल्यानंतर कपडे खरेदीसाठी कोणी आले नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी दशरथकडे कठोरपणे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
17 एप्रिलला दुपारी दशरथ रूपेशला घेऊन दिव्यातील बंद असलेल्या एका शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर गेला. नंतर त्याने रूपेशची गळा दाबून हत्या केली. दशरथच्या घराशेजारी रूपेश थुंकत असल्याच्या रागातून या दोघांमध्ये वादही झाले होते. याच रागातून आरोपीने रूपेशची हत्या केली.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…