Suggestions for preparing development plan considering pilgrimage sites and ancient structures

तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना

महाराष्ट्र

मुंबई : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपस्थित मंत्री महोदयांनी दिल्या. आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात आज दुपारी पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, की पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करणारे सल्लागार आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे. वारकऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूप आराखड्यातील सकारात्मक बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री यांच्यास्तरावर होईल. मात्र, या बैठकीत होणाऱ्या चर्चेअंती मिळणाऱ्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे. वाराणसीमध्ये झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाची माहिती प्रशासनाने घेत स्थानिक नागरिकांच्या सूचना ऐकून घ्याव्यात. त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती वारकऱ्यांना द्यावी.

डॉ. सावंत यांनी सांगितले की, पंढरपूर हे जागतिक पातळीवरील तीर्थक्षेत्र आहे. तेथे रोज हजारो भाविकांची वर्दळ असते. त्यानुसार भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी हा कॉरिडॉर शासनातर्फे आहे. पर्यटन मंत्री सामंत यांनी सांगितले की, वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर विकास करताना स्थानिकांच्या भावना लक्षात घेवून पंढरपूर विकासाचे वेगळे मॉडेल तयार करण्यात येईल. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यात येईल. महसूल मंत्री विखे पाटील यांनी शासन स्तरावरून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आमदार औताडे, जानकर, अहिर, श्रीमती कायंदे यांनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या आराखड्याबाबत नागरिकांच्या असलेल्या हरकती आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत माहिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत