Blood donation camp organized by DCC Infotech Private Limited
पुणे महाराष्ट्र

डी सी सी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : डी सी सी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकूण १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सद्यस्थितीत पुणे शहरात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कंपनीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले.

या उपक्रमात कंपनीचे संचालक शरद मुलमुले, अनिरुद्ध म्हस्के, लहुराज गायकवाड, जीवन कदम, शरद लोंढे, आणि जयसिंग जाधव यांनी पुढाकार घेतला. तसेच कंपनीचे इतर पदाधिकारी रोहित पुरी, प्रशांत पवार, राजेश नवले यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सामाजिक कार्यकर्ते अपूर्व खाडे आणि प्रसन्न मोरे यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. सर्व रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेत समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली.

कंपनीचे संचालक जीवन कदम यांनी सांगितले की, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असून प्रत्येकाने या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे. पुणेकरांच्या आरोग्यासाठी हे आमचे लहानसे योगदान आहे.”

या यशस्वी रक्तदान शिबिरामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार असून, कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम एक आदर्श ठरला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत