Padmashi

यशोगाथा : कष्ट आणि संघर्ष करून पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे झाल्या पीएसआय

महाराष्ट्र महिला विशेष

यशोगाथा : सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झालेल्या पद्मशीला तिरपुडे यांच्या विषयी जाणून घेऊया..
पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे याच्या मजूर कुटूंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला. दोन लहानगी मुलं घेवून या पती-पत्नीने जी असामान्य धडपड केली तिला यश आले, त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण करून चक्क पोलीस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली. पद्मशीला तिरपुडे या महिलेने सर्व अडथळे पार करत मोलमजुरी ते पोलिस उपनिरीक्षक हा प्रवास पार केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पद्मशीला यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीत झालेल्या उपनिरिक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा पद्मशीला तिरपुडेंसाठी आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. तो अनुभवण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला.

मुळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे यांचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पद्मशीला तिरपुडे (पोलिस उपनिरीक्षक) सांगतात “ पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलं. हमाली केली. समोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट कामाला आले.”

पद्मशीला म्हणाल्या, “आयुष्यात एक दिवस असा आला, की घरात अन्नाचा दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. खूप वाईट वाटले. खूप रडलो तसेच उपाशी झोपलो, पण त्या दिवशीच निश्चय केला कि, मोठ्ठ अधिकारी व्हायचं.”. पद्मशीला शिकल्या अन् मोठी अधिकारी व्हायचं या स्वप्नासाठी त्यांनी खूप कष्ट केले. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. मजुरीचे काम करुन घर चालत होते. पण त्यांच्या मनात यातून बाहेर पडण्याची जिद्द होती, त्यांना त्यांच्या पतीची साथ होती त्यामुळे अनेक आव्हानांशी लढत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनतर एमपीएसीच्या परिक्षेत उत्तिर्ण होत त्यांची निवड राज्य पोलिस दलात उपनिरिक्षक पदावर झाली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने २०१४ साली प्रकाशित केलेल्या यशोगाथा या नियतकालिकात तिरपुडे यांच्या संघर्षाची माहिती देणारा लेख प्रकाशित करण्यात आला होता. घटना जुनी असली तरीही प्रेरणादायी…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत