मुंबई

परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ

जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना देखील घेता येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असं सांगितलं आहे. परदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही सामाजिक न्याय विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करून जाहीर करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या 27 जून 2017 च्या सुधारित नियमावलीनुसार परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा अशी अट होती. परंतु कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी भारतात राहूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते व असे विद्यार्थी संस्थेत पूर्णवेळ प्रवेशित नसल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून कोविडचा प्रादूर्भाव संपुष्टात येईपर्यंत किंवा संबंधित विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत भारतात राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना एक विशेष बाब म्हणून विद्यापीठाची अनुज्ञेय (Permissible) फी मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंडे यांनी घेतला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

6 दिवस ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

6 दिवस ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago