delhi police special cell arrested pakistani isi trained terrorist
क्रीडा महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! आयपीएल सामन्यांवर दहशतवादाचे सावट, चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी दिली कबुली

IPL २०२२ : आयपीएलवर यावेळी दहशतवादाचे सावट पसरले आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. एटीएसच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांनी वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि आजूबाजूच्या रस्त्याची रेकी केली आणि सुरक्षेचाही आढावा घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम, खेळाडू ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी २६ मार्च ते २२ मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्बशोधक पथक आणि राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या कबुलीनंतर आता खेळाडूंच्या बसला कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी विशेष एस्कॉर्ट देण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्थेसोबतच पंच आणि सामना अधिकाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत