मुंबई : शुक्रवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. हा अपघात रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झाला. टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि काही वेळातच परिसरात धुराचे लोट पसरले.
दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तथापि, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणी गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेचा पुढील तपास मरीन ड्राइव्ह पोलिस करत आहेत.




