Amit Deshmukh will follow up on allowances for nurses

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ, वाढविलेली प्रवेश क्षमता याप्रमाणे…

महाराष्ट्र

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या निर्णयानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नव्याने वाढविण्यात आलेली महाविद्यालयनिहाय प्रवेश क्षमता याप्रमाणे आहे.

  • मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरीटेबल रुग्णालयात डी.एम. (D.M. Nephrology) या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ 1 वरुन 3 करण्यात आली आहे.
  • यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. (MD Anesthesiology) या विषयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता 4 असणार आहे.
  • स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम.डी. (MD General Medicine) आणि एम.एस. (जनरल सर्जरी) या दोन विषयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे 3 वरुन 6 आणि 3 वरुन 5 इतकी वाढ करण्यात आली आहे.
  • कोल्हापूरच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Microbiology), (M.D. Pathology), (M.D. Pharmacology), (M.D. Respiratory Medicine) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 3, 4, 3 आणि 2 इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे. याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Anesthesiology), (M.D. Otorhinolaryngology), (M.D. General Medicine), (M.S. General Surgery), (M.S. Obstetrics & Gynecology), (M.D. Bio Chemistry), आणि (M.S. Ophthalmology), या 7 अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 4, 3, 9, 3, 3, 4 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.
  • एम.डी (M.D. Radio- diagnosis) आणि (M.D. Pediatrics) या 2 विषयात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत अनुक्रमे 5 वरुन 6 आणि 4 वरुन 6 इतकी वाढ करण्यात आली आहे.
  • लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Dermatology, Venereology & Leprosy) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली असून येथील विद्यार्थी प्रवेश क्षमता 3 असणार आहे.
  • पुण्यातील बे.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D Emergency Medicine), हा अभ्यासक्रम 3 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत