Narayan Rane warns CM uddhav thakre
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. राणे कुटुंबीयांना बेडूक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राणेंनी गांडुळाची उपमा दिली. राणे कुटुंबीयांच्या वाटेला जाल तर ३९ वर्षांत पाहिलेला, अनुभवलेला सगळा इतिहास बाहेर काढेन,’ असा इशारा यावेळी राणेंनी दिला.
दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे पिता-पुत्रांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना बेडकाची उपमा दिली होती. ‘स्वत:ला वाघ म्हणवून घेता? कुणी सांगितलं तुम्ही वाघ आहात? मग पिंजऱ्यातले वाघ आहात की आणखी कुठले तेही सांगा,’ अशा शब्दांत नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.
‘तब्बल ३९ वर्षे मी शिवसेनेत होतो. माननीय बाळासाहेबांनी मला अनेक पदं दिली. मंत्री केलं. मुख्यमंत्री केलं. बेडूक म्हणून हे सगळं मला दिलं नाही. वाघ म्हणून दिलं. उद्धव ठाकरेंना नाही दिलं. कारण, उद्धव ठाकरे हे बुळचट आणि शेळपट आहेत. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. बाळासाहेबांचं नाव घ्यायचीही त्यांची लायकी नाही. बाळासाहेबांना ह्यांनी छळलं होतं. त्यांच्या हयातीतच त्यांचे निर्णय फिरवले जात होते,’ असा आरोप राणेंनी केला.
‘हे स्वत:ला वाघ म्हणवून घेतात. कधी कोणाच्या कानफाटात मारलीय का? आमच्यासारख्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली. केसेस आम्ही घेतल्या,’ असं राणे म्हणाले. आडवे येणाऱ्यास आडवे करून पाडवा करू, अशी टीका उद्धव यांनी विरोधकांवर केली होती. त्यावर, ‘आडवे करण्याची भाषा करतात. एकटे नीलेश आणि नीतेश ह्यांना पुरून उरतील. एकटा नीतेश विधानसभेत ह्यांना भारी पडतो,’ असं राणे म्हणाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…