Bachchu Kadu harshly criticized Raosaheb Danve
महाराष्ट्र

आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे – बच्चू कडू

दिल्लीत काही दिवसांपासून व्यापक स्वरूपात शेतकरी आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं. सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघाती टीका केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. तसंच, “गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं बच्चू कडू म्हणाले. “सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे हे समजण्यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असंही कडू यावेळी म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत