Awarded Junnar Taluka Meritorious Teacher Award 2022 to Vijay Nagre

विजय नागरे यांना जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ प्रदान…

अहमदनगर पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

शिबलापुर (आश्वी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेतील पदवीधर शिक्षक व शिबलापूर येथील प्रगतशील शेतकरी जिजाबा गंगाधर नागरे यांचे सुपुत्र विजय जिजाबा नागरे यांना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. ओतूर येथे झालेल्या गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा. अतुलशेठ बेनके, पंचायत समिती जुन्नरचे सभापती सन्माननीय विशालजी तांबे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कदम म्हणाल्या की, शाळेला मिळालेला अध्यक्ष चषक पुरस्कार 2018, स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2022, विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा व गुणवत्ता स्पर्धेत तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व, शालेय गुणवत्ता, भौतिक सुविधा, लोकसहभाग मिळवणे, क्रीडा स्पर्धा केंद्र व बीट पातळी यशस्वी आयोजन, प्रशासकीय कामकाज व शालेय नियोजन या सर्व प्रशासकीय कामात विजय नागरे यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या या उत्कृष्ट कामकाजाबद्दल त्यांना जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 मिळाल्याचे समाधान वाटते.

गुंजाळवाडी शाळेतील पदवीधर शिक्षक विजय नागरे यांना जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 मिळाल्याबद्दल शिबलापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सुनील मुन्तोडे व सर्व सदस्य, पतसंस्था चेअरमन व सर्व संचालक, सोसायटी चेअरमन भीमाजी बोंद्रे सर, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य यमुना नागरे, माजी सरपंच दिलावर शेख, जहुरभाई शेख, तबाजी मुन्तोडे, आण्णासाहेब म्हस्के, नंदूकुमार वालझाडे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिबलापूर, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद प्रवरा माध्यमिक विद्यालय शिबलापुर तसेच समस्त ग्रामस्थ शिबलापूर यांच्याकडून विजय नागरे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत