औरंगाबाद : औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. नंदकुमार घोडेले यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच नंदकुमार घोडेले हे अनेक उपाययोजना करत होते. गेल्या काही दिवसांपासून विविध बैठकांनाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.