caretaker throws 13 month old girl broken bones

चिंताजनक! शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिस

अहमदनगर महाराष्ट्र

अहमदनगर : शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट (PMT) रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत राहते. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली असून धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. २७ मे रोजी या चिमुकलीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यानंतर तिला कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यानुसार उपचार सुरू केले. मात्र, काही सुधारणा न झाल्यामुळे तिला नाशिकला हलविण्यात आले. तेथे तिची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. मात्र, रक्त तपासणी केली असता तिच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी तिला कोरोना होऊन गेल्याचे निदान केले. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला.

या मुलीच्या कुटुंबियांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांनी सुरुवातीला नातेवाईकांकडून पैसे घेऊन उपचार केले. त्यानंतर नाशिकमध्ये उपचार घेणे न परवडल्यामुळे त्यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाने त्यांना सहकार्य केले. या मुलीला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तेथे बालरोग विभागात डॉ. संजीव यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत