Banks will remain closed for three consecutive days this week

बँका सलग तीन दिवस बंद राहणार, सर्व महत्वाची कामं मार्गी लावा

काम-धंदा देश

या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे, आपली सर्व महत्वाची कामं गुरुवारपर्यंत मार्गी लावा. बँका प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार पडत आहे. यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. तर शुक्रवारी २५ डिसेंबर असल्याने ख्रिसमस हा सण आहे, ज्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. अशा प्रकारे बँका सलग तीन दिवस बंद राहतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यामुळे आपले बँकेत आवश्यक काम असल्यास गुरुवारपर्यंत ते निकाली लावणे योग्य होईल. महत्त्वाचे म्हणजे त्यापुढील आठवड्यात वर्षाचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर बरेच नियम व कायदे देखील बदलणार आहेत.

आयकर विवरणपत्र भरण्याचीही 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. म्हणूनच, जर तुम्हाला बँकेतून काही कागदपत्रांची आवश्यकता असेल किंवा इतर कोणतेही तातडीचे काम असेल तर त्यासाठी आतापासूनच तयार राहणे योग्य ठरेल. आयकर परताव्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट, व्याज उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म 26 एएस अशी अनेक प्रकारची कागदपत्रे आपल्या बँकेकडून घ्यावी लागू शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत