Vijay Mallya's assets worth Rs 14 crore seized in France

विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता जप्त

ग्लोबल देश

फ्रेंच अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता ईडीच्या सांगण्यावरून जप्त केली आहे. युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे, असं ईडीने म्हटलं आहे. विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH या ठिकाणी असलेली मालमत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. विजय मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. जानेवारी २०१९ मध्ये विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत कोर्टाने फरार घोषित केले होते. मार्च २०१९ पासून तो लंडनमध्ये राहतो आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

ब्रिटनमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातला खटला सुरु आहे. याआधी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला विजय मल्ल्याच्या वकिलांनी आव्हान दिलं. तसंच विजय मल्ल्याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विनंती केली आहे. भारत सरकारने याप्रकरणी विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावं अशी विनंती केली आहे. किंगफिशर एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून सुमारे ७ हजार कोटींचं कर्ज देणअयात आलं होतं. व्याज आणि दंड यांची रक्कम मिळून कर्जाचा हा डोंगर १२ हजार कोटींपर्यंत वाढला आहे. दरम्यान विजय मल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर कर्ज बुडवल्याचा आरोप फेटाळून लावला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत