The woman became pregnant again before giving birth to twins
ग्लोबल

दुर्मिळ : महिलेला अगोदर जुळ्या मुलांची गर्भधारणा, प्रसूतीपूर्वीच झाली पुन्हा गर्भवती

अमेरिकेत एका महिलेसोबत एक अतिशय दुर्मीळ घटना घडली आहे. जुळ्या मुलांची गर्भधारणा झाल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांना कळले की त्या तिसरे मूल कन्सिव्ह करत आहेत. टिकटॉकवर लोकप्रिय असलेल्या या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना याबद्दलची माहिती दिली असून तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या महिलेने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की ही सुपर फिटीशनची केस आहे. 2016 च्या एका अहवालानुसार, सुपर फिटीशनच्या फारच कमी केस डॉक्युमेंट केलेल्या आहेत. ही महिला काही दिवसांच्या कालावधीत दुसर्‍यांदा गर्भवती झाली. या महिलेने सांगितले कि, मी माझ्या पहिल्या गरोदरपणातच जॅकपॉट मिळविला आहे आणि तीन मुले एकत्र येत आहेत, त्यामुळे ही माझी पहिली आणि शेवटची गर्भधारणा असेल, अशी शक्यता आहे.

टिकटॉकवरील व्हायरल क्लिपमध्ये या महिलेने सांगितले कि, ‘माझे तिसरे बाळ पहिल्या दोन बाळांपेक्षा फक्त 10 किंवा 11 दिवस लहान आहे. यावरून आम्हाला समजले की ही माझी दुसरी गर्भधारणा आहे. हे मूल कुपोषित नाही आणि हे खरोखरच सुपर फिटीशन आहे. डॉक्टर लक्ष देत असून दर दोन आठवड्यांनी माझे अल्ट्रास्कॅन करत आहेत.’

ते पुढे म्हणाले की आणि ‘हे मूल हेल्दी असून व्यवस्थित वाढत आहे.’ आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी ही क्लिप टिकटॉकवर पाहिली आहे. ही महिला सातत्याने तिच्या बाळांविषयी अपडेट देत असते.

ही महिला म्हणाली कि, ‘आम्हाला पालक बनण्याची इच्छा होती आणि आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यात तीन मुले एकत्र येत आहेत. थोडी काळजी वाटत आहे पण मी खूप उत्साही आहे. मी सध्या खूप मिश्र भावनांमधून जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत