Tiger Shark Attack

वडिलांच्या डोळ्यादेखत 23 वर्षीय तरुणाचे टायगर शार्कने केले तुकडे-तुकडे, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर…

ग्लोबल

गुरुवारी घडलेल्या एका दुःखद घटनेत, हुरघाडा येथे टायगर शार्कच्या हल्ल्यात एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला. व्लादिमीर पोपोव्ह असे या व्यक्तीचे नाव असून, तो पोहण्यासाठी गेला असताना पाण्यात टायगर शार्कने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या असहाय्य वडिलांच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला. इजिप्शियन रेड सी रिसॉर्ट, शहर हुरघाडा येथे ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हुरघाडा येथील रशियाच्या वाणिज्य दूतावासाने काल शार्कच्या हल्ल्यात २३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये एका मोठ्या शार्कने त्या माणसाचे तुकडे-तुकडे केल्याचे दाखवले आहे.

या घटनेनंतर परिसरातील वॉटरस्पोर्ट्स बंद 
ही भयानक घटना घडल्यानंतर काही वेळातच वाणिज्य दूतावासाने आपल्या फेसबुक पेजवर सध्या हुरघाडामध्ये असलेल्या रशियन नागरिकांना समुद्रात असताना सतर्क राहण्याचा आणि पोहणे आणि डायव्हिंग बंदीच्या बाबतीत इजिप्शियन अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा दिला आहे.

हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, इजिप्शियन पर्यावरण मंत्रालयाने तपासणी आणि सर्वेक्षण करण्यासाठी शुक्रवारपासून दोन दिवस अल्-गौना रिसॉर्ट आणि सोमा बे दरम्यान रेड सी समुद्रात पोहणे, स्नॉर्कलिंग आणि इतर जलक्रीडा प्रकार थांबवले आहेत.

‘त्या’ शार्कला पकड्ण्यात आले
इजिप्शियन टीमने या हल्ल्यामागे टायगर शार्कचा एक प्रकार असल्याचे सांगितले. शार्क पकडला गेला आणि तपासणीसाठी मंत्रालयाच्या प्रयोगशाळेत पाठवला गेला आहे.

सिन्हुआच्या वृत्तानुसार, पीडित ज्या हॉटेलमध्ये राहत होता, त्या हॉटेलच्या जीवरक्षकांना त्याच्या शरीराचा एक भाग सापडला. मृताच्या मैत्रिणीसह आणखी दोन पर्यटक शार्कच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इजिप्तमधील रेड सी रिसॉर्ट्सवर शार्कचे हल्ले तुलनेने दुर्मिळ आहेत, परंतु गेल्या वर्षी दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी देशाच्या रेड समुद्र किनारपट्टीचा एक भाग बंद केला होता. इजिप्तमधील रेड समुद्रातील रिसॉर्ट्स, विशेषत: हुरघाडा, रशियन पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत