Akshay Kumar's film 'Laxmi' leaked online

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ चित्रपट प्रीमिअरच्या अगोदरच झाला ऑनलाइन लीक

मनोरंजन

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘लक्ष्मी’ प्रीमियरच्या आधीच ऑनलाइन लीक झाला. हा चित्रपट अनेक टॉरंट वेबसाइटवर एचडी क्वालिटी मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील निश्चित वेळेच्या दीड तास अगोदरच म्हणजे संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रदर्शित केला. राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रदर्शित होणार होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘लक्ष्मी’ चित्रपट आधीच वादांमध्ये अडकला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर लव्ह-जिहादचा प्रचार केल्याचा आरोप झाला होता. हिंदू संघटनांनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आणि त्या विरोधात मोर्चा केला. यामुळे रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचे शीर्षक ‘लक्ष्मी बॉम्ब’ बदलून लक्ष्मी असे करण्यात आले.

चित्रपटाची कथा आसिफ (अक्षय कुमार) नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, जो प्रिया (कियारा अडवाणी) या मुलीच्या प्रेमात आहे. आसिफ प्रियाच्या कुटूंबाला समजावण्यासाठी व लग्नास तयार करण्यासाठी जातो. परंतु तिथे त्याच्या शरीरात आत्मा प्रवेश करतो. अक्षयने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत लक्ष्मीसारखी भूमिका केली नव्हती. राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी’ हा त्यांच्याच तामिळ चित्रपट ‘कंचना‘ चा हिंदी रिमेक आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत