Man Killed His Wife And Son With The Help Of Girlfriend

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या; पतीने प्रेयसीच्या मदतीने केले भयंकर कृत्य

क्राईम पुणे महाराष्ट्र

दौंड : प्रेयसी आणि अन्य एका महिलेच्या मदतीने पत्नी व मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीसह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब मारुती शेलार (वय ३४, रा. केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस येथील महिला लीना सचिन सोनवणे (वय ३५) आणि तिचा सात वर्षांचा मुलगा ओम सोनवणे यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला होता. ही घटना मंगळवारी पहाटे समोर आली. मात्र, ही आत्महत्या नसल्याचा संशय आल्याने यवत पोलिसांनी तपासाला वेग देऊन अवघ्या पाच तासांत खुनाचा छडा लावला. मृत लीना यांचा पती सचिन दिलीप सोनवणे (वय ३७, रा. सध्या रा. मांजरी, ता. हवेली, मूळ पाटस) याने प्रेयसी रेणुका उर्फ प्रणाली भारत तळेकर आणि अन्य एका महिलेच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पाटस येथील स्वराज व्हॅली अपार्टमेंट येथे लीना सोनवणे या चार वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत होत्या. त्यांच्याबरोबर मुलगी वैष्णवी आणि मुलगा ओम देखील राहत होते.

दरम्यान, सचिन सोनवणे याला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. सचिन त्याची प्रेयसी आणि एका महिलेसह मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाटस येथे आला. तिघांनी लीना आणि मुलगा ओम याला मारहाण केली. यावेळी मुलगी वैष्णवी घरातच होती. वैष्णवी झोपी गेल्यानंतर आरोपींनी लीना आणि ओम यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह पंख्याला लटकावले. वैष्णवीला सकाळी जाग आल्यानंतर आईचा मृतदेह स्वयंपाक घरातील पंख्याला आणि ओमचा मृतदेह बेडरूममधील पंख्याला लटकलेला पाहिला. घाबरलेल्या वैष्णवीने फोन करून नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइक आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.

पोलिसांनी हत्येच्या कोनातून तपास केला आणि आरोपींचा छडा लावला. पोलिसांनी वैष्णवीला विश्‍वासात घेऊन माहिती विचारली असता मारहाणीची सर्व घटना तिने सांगितली. खून केल्यानंतर आरोपी सचिन सोनवणे पुण्याला निघून गेला होता. सचिन सोनवणे पुण्यावरून पाटस येथे दाखल झाल्यानंतर त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले. चौकशीदरम्यान त्याने दोघांच्या खुनाची कबुली दिली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत