क्राईम

‘तुला मुलीच होतात’ असे म्हणत केली पत्नीची हत्या, सात वर्षांच्या मुलीने दिली वडिलांविरोधात साक्ष आणि..

जळगाव : पत्नीचा लाकडी दांडा डोक्यात मारुन खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने काल (१९ मे) जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पप्पू रतन पवार (वय ३१ रा. पाचोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी कस्तुराबाई पप्पू पवार (वय ३०) यांचा खून केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या आरोपीच्या सात वर्षाच्या मुलीची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.

आरोपी पप्पु रतन पवार हा त्याची पत्नी कस्तुराबाई व तीन मुलींसह पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे राहत होता. पाचोरा येथील एका हॉटेलवर पप्पू काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. पप्पु आणि कस्तूराबाई यांना तीनही मुली असल्यामुळे पप्पू नेहमी कस्तूराबाई यांना दोष द्यायचा आणि मुलगा होत नाही या कारणावरुन वेळावेळी कस्तूराबाई यांना मारहाण करायचा. ९ जून २०१९ रोजी रात्री पप्पू पवारने ‘तुला मुलीच होतात’ असे म्हणत पत्नी कस्तुराबाईशी भांडण सुरु केले, नंतर तिला शिवीगाळ केली आणि रागाच्या भरात लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात मारले. त्यात कस्तूरीबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तूराबाई यांची आई पद्माबाई सखाराम राठोड (वय ६० रा. आनंद नगर तांडा) यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला भा. दं. वि. कलम ३०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेच्या दुसर्‍या दिवशी पोलिसांनी आरोपी पप्पू पवार याला अटक केली. गुन्हा घडल्यापासून आरोपी पती कारागृहातच होता. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी तपास पूर्ण करुन या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. खटल्यावर सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए.सानप याच्या समोर कामकाज चालले. त्यांच्या समक्ष या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकारी पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून खटल्याचे काम पूर्ण केले.

या खटल्यात प्रामुख्याने आरोपीची सात वर्षांची मोठी मुलगी गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली. ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली होती. तिने सर्व घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला. न्यायालयाने तिला विचारले, मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे ? तेव्हा तिने तिच्या वडिलांकडे बोट दाखवले. या व्यतिरिक्त फिर्यादी पद्माबाई राठोड, डॉ. निलेश देवराज, पंच साक्षीदार व पोलीस उपनिरिक्षक पंकज शिंदे यांच्या देखील साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायालयाने आरोपी पप्पु पवार याला पत्नी कस्तुराबाई यांचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

RTPCR चाचणीसाठी नाक आणि तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही, वापरणार ‘ही’ सोपी पद्धत

‘लिव्ह इन रिलेशनशीप’ अस्वीकारार्ह, जोडप्याला सुरक्षा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

2 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

2 आठवडे ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

2 आठवडे ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago